खासदार संभाजीराजेंची मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची घोषणा




 खासदार संभाजीराजेंची मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची घोषणा



कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस तापत चालला आहे. यासाठी खासदार संभाजीराजे यांनी ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरुन आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे कोल्हापूरातून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणाच्या या प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडलं आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँगमार्चचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025


Comments