बाप:-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास




बाप


बाप फळा

बाप शाळा

आयुष्य घडवायला लेकरांची

बाप झिजनाऱ्या खडूसारखा


समस्येवर

गणिती सूत्र

भूमितीच्या प्रमेया सारखा


आयुष्य बदलवणारा बाप

विज्ञानाच्या रसायना सारखा


बाप भूगोल 

बाप राज्यव्यवस्था

बाप कुटुंबाचा आधार

लोकशाहीच्या चार स्तंभासारखा


बाप शास्त्र

बाप तत्वज्ञान

बापचा संघर्ष 

इतिहासाच्या सुवर्ण अक्षरी पानासारखा 


बाप कथा

बाप कविता

बाप अगदी आवडणाऱ्या धड्या सारखा


खंत एवढीच 

आयुष्य घडविणारा

बाप समजला नाही 

अगदीच शाळेतील त्या पुस्तकासारखा



रत्नदीप चंदूताई शेषराव खांडेकर
रा.आदर्श ग्राम भगोरा,ता. मूर्तिजापूर
जि.अकोला-४४४१०७
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 



२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

news.mangocity.org