फेसबुक रिक्वेस्ट पाठवत लसीकरणाचे करण्याचे दिले आमिष; वृद्धाकडून लाखो रुपये केले लंपास
फेसबुक रिक्वेस्ट पाठवत लसीकरणाचे करण्याचे दिले आमिष; वृद्धाकडून लाखो रुपये केले लंपास
याप्रकरणी दोघांना पवई पोलिसांनी दिल्लीमधुन अटक केली आहे.
मुंबई:वृद्धाशी ‘फेसबुक’ वर मैत्री करत त्यांच्या नावाने लसीकरण करण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी दोघा भामट्यांना पवई पोलिसांनी दिल्लीमधुन अटक केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायीक असुन त्यांना आरोपींनी काही दिवसांपूर्वी ‘फेसबुक’ वर रिक्वेस्ट पाठवत त्यांच्याशी मैत्री केली. ते एका एनजीओचे प्रतिनिधी आहेत अशी ओळख करून दिली होती. त्यांच्यात मैत्री वाढल्यानंतर तक्रारदार राहत असलेल्या परिसरात लसीकरण करण्याचा प्रस्ताव टोळक्याने त्यांच्यासमोर ठेवला. त्यासाठी काही रकमेची देखील मागणी केली.सदर लसीकरण हे तक्रारदाराच्या नावाने करण्यात येईल असेही सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने त्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन २० लाख रुपये पाठविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात लसीकरण करण्यात आलेच नाही. तसेच पैसे मिळाल्यानंतर एनजीओ म्हणवणाऱ्यांनी त्यांना संपर्कही केला नाही. त्यामुळे तक्रारदाराला संशय आला आणि त्याने पवई पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली.याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनवणे यांना विचारले असता ३ लाख ४७ हजार रुपये ऑनलाइन पाठविण्यात आले असुन आरोपीला रिमांडसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले. मात्र या प्रकाराबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले. दरम्यान पवई पोलिसांनी दोघांना याप्रकरणी अटक केली असुन अधिक तपास सुरू आहे.
चांगल्या कामासाठी गिफ्ट
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 844844025

Comments
Post a Comment