केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने १ लाख ६४ हजारांची ऑनलाईन फसवणूक



 केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने १ लाख ६४ हजारांची ऑनलाईन फसवणूक


 रत्नागिरी : बीएसएनएल मोबाईलची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एकाची सुमारे १ लाख ६४ हजार ९९९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शर्मा नावाच्या व्यक्तीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २५ जून रोजी घडली. याबाबत कुलविंदर सिंग सिद्दू (वय 56, मूळ रा.पंजाब सध्या रा. कोस्टगार्ड विमानतळ एमआयडीसी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे याबद्दल तक्रार दिली. त्यानुसार, शर्माने शुक्रवारी सायंकाळी सिद्दू यांच्या मोबाईलवर फोन करून तुमच्या बीएसएनएल मोबाईलची केवायसी अपडेट करायची असल्याची बतावणी केली. त्याने पाठवलेल्या लिंकवर सिद्दू यांनी क्लिक केले. त्यानंतर सिद्दू यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख ६४ हजार ९९९ रुपये काढून त्यांची फसवणूक केली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव करत आहेत.


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments