रत्नागिरी कॉंग्रेस भुवन येथे मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत व्यक्त केला निषेध





रत्नागिरी कॉंग्रेस भुवन येथे मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत व्यक्त केला निषेध



 रत्नागिरी:-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड विजयराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन कार्यालय समोर " सात वर्ष अपयशाची जनते वरील अन्यायाची " केंद्र सरकार/ मोदी सरकार /भाजप सरकार विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला .सदर आंदोलनाच्या वेळी सात वर्षे अपयशाची जनते वरील अन्यायाची, मोदी सरकार हाय हाय,मोदी सरकारचा निषेध असो अश्या घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणदणून गेला होता. तदप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी, सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर काद्री, मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, महिला तालुकाध्यक्ष रिझवना शेख, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर उपस्थित होते.



२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Comments