रेमडेसिविरला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या टोसिलिझुमॅबचाही तुटवडा
रेमडेसिविरला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या टोसिलिझुमॅबचाही तुटवडा
मुंबई:-रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता सहज होत नसल्याने अनेक रुग्णालयांनी आता टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा पर्याय रुग्णांच्या नातेवाईकांना दिला आहे. हे इंजेक्शन मिळण्याासाठी आता रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. हे इंजेक्शन दोन दिवसांपासून मुंबईमध्ये कुठेही उपलब्ध नाही. अन्न व औषध प्रशासनानेही या इंजेक्शनची उपलब्धता नसल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.खासगी रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या करोना रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी या इंजेक्शनचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले जाते. रेमडेसिवीर तसेच टोसिलिझुमॅब ही दोन्ही इंजेक्शन करोनासंसर्गाच्या उपचारावर खात्रीशीर उपयुक्त ठरतात, असा कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र तरीही काही रुग्णांमध्ये याचा वैद्यकीय लाभ दिसून आल्यामुळे ही इंजेक्शन दिली जातात. मागणी वाढल्याने तसेच पुरवठा कमी होत असल्याामुळे या इंजेक्शनची उपलब्धता नाही. फोन करून एका ठिकाणांहून दुसरीकडे गरजू रुग्णांचे नातेवाईक ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल पर्यंत सगळीकडे फिरत राहतात. तरीही या इंजेक्शनची उपलब्धता होत नसल्याचा अनुभव राजू पाटील या रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितला. या इंजेक्शनची उपलब्धता करून देत असलेल्या कंपन्यांनी त्यांचे हेल्पलाइन नंबरही बंद ठेवले आहे. इंजेक्शनची उपलब्धता नसल्याने केवळ नाव व दूरध्वनी क्रमाकांची नोंद या क्रमाकांवर केली जाते. मात्र, त्यानंतर प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव रुग्णांच्या नातेवाईकांना वारंवार येत आहे.
रुग्णांचे नातेवाईक वेठीला का?
एकीकडे सरकार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय व्यवस्था निर्माण करून इंजेक्शनचा साठा संबधित करोना रुग्णालयांसह इतर गरज असलेल्या रुग्णालयांना करेल, असे सांगते. मात्र, आज चार दिवस उलटून गेल्यानंतर केवळ रेमडेसिवीर नाही तर इतर पर्यायी औषधांचीही उपलब्धता होत नाही. हा ताण पुन्हा रुग्णांच्या कुटुंबीयांवरच येतो. ही दोन्ही इंजेक्शन जीवनदायी असल्याचा १०० टक्के दावा केला जात नसला तरीही डॉक्टरांनी औषध लिहून दिल्यानंतर कुटुंबीयांची अवस्था दयनीय होते. त्यामुळे सरकारने केलेली घोषणा प्रत्यक्षात केव्हा येईल, असा उद्विग्न प्रश्न सामान्यांनी उपस्थित केला आहे.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment