नागपूर हादरलं! कारमध्ये गतिमंद मुलीवर ओला चालकाने केला अत्याचार
नागपूर हादरलं! कारमध्ये गतिमंद मुलीवर ओला चालकाने केला अत्याचार
नागपूर:-गतिमंद १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर कारमध्ये अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अपहरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल करून ओला चालकाला अटक केली आहे. विश्वास लक्ष्मीकांत मंडल (वय ३३, रा. ओंकारनगर), असे अटकेतील चालकाचे नाव आहेपीडित गतिमंद १७ वर्षीय मुलगी बेलतरोडी परिसरात राहाते. ६ एप्रिलला ती आईसह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेली होती. यावेळी ती आईचा हात सोडून मेडिकल चौकात आली. तेथे विश्वास हा कारमध्ये होता. 'मला फिरवून आण', असे ती विश्वास याला म्हणाली. विश्वास तिला घेऊन वाडी येथे गेला. तेथील जंगलात कारमध्ये त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो तिला घेऊन शिवणगाव येथे गेला. तेथून त्याने मुलीला रेल्वेस्थानकावर सोडले. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. बेलतरोडी पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची नोंद घेतली. मुलगी गोंदियाला जाणाऱ्या रेल्वेत बसली. तिने एका प्रवाशाच्या मोबाइलवरून आपल्या आईच्या मोबाइलवर संपर्क साधला. मुलीच्या आईने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे मुलीचे लोकेशन शोधले. ती गोंदियाला जाणार असल्याचे समजताच पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाच्या मदतीने मुलीला गोंदिया रेल्वेस्थानकावर उतरविले. मुलीला नागपुरात आणले. चौकशीदरम्यान एका चालकाने अत्याचार केल्याचे तिने सांगितले.पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांनी लगेच ओलाचालकाचा शोध सुरू केला. मेडिकल चौकातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. कारच्या क्रमांकावरून पोलिसांनी विश्वास याला अटक केली.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment