तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरु
तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरु
जिल्ह्यात पुढील १ महिन्यात ५ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार
रत्नागिरी : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंखेमुळे आरोग्ययंत्रणेवर प्रचंड ताण पडत असून तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने आता आरोग्य यंत्रणेतील त्रुटी भरून काढण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरु असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय समंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ते म्हाणाले कि वाढत्या कोरोना रुग्णांच्या संखेमुळे जिल्ह्यात पुढील १ महिन्यात ५ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात येणार आहेत. आजच्या घडीला २८ मेट्रिक टन म्हणजेच ३ दिवस पुरेल इतका ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. महिला रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट साठी ९० लाखांची प्रसाशाकीय मंजुरी देण्यात आली आहे. ५ ते ६ दिवसात जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरु होणार आहे. यामुळे महिला रुग्णालयात ३० व जिल्हा रुग्णालयात ३० असे एकूण ६० ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहे. १० नवे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्टची संख्या वाढवण्यात आली असून या ठिकाणी अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ६५ ठिकाणी लसीकरण सुरु आहे. पूर्ण जिल्ह्यात जनरल बेड २०५५ असून यामध्ये देखील दोन दिवसात वाढ होणार आहे. जिल्ह्यातील हॉटेल ताब्यात घेऊन त्याठिकाणी सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची व्यवस्था केली जाणार आहे. शिवाय जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची देखील मदत घेतली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय समंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment