मुंब्रा खाडीत तीन मुले बुडाली; दोघांचे मृतदेह हाती, एकाचा शोध सुरू







 मुंब्रा खाडीत तीन मुले बुडाली; दोघांचे मृतदेह हाती, एकाचा शोध सुरू




ठाणे: पोहण्यासाठी गेलेली तीन मुले मुंब्रा येथील खाडीमध्ये बुडाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तीन मुलांपैकी दोघांना खाडीमधून बाहेर काढण्यात आलं आहे. तिसऱ्या मुलाचा शोध अद्यापही सुरू आहे.बुधवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही तिन्ही मुलं रेल्वे ट्रॅकच्या बाजूच्या खाडीत पोहायला गेली होती. रात्रीच्या वेळी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही मुलं बुडाली. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान व पोलिस कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले आणि लगेच मदतकार्यास सुरुवात केली.काही वेळाच्या शोधानंतर दोन मुलांचे मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आले. दाऊद अकबर सेलाफी (वय १६ वर्षे), मोहीम (वय १६ वर्षे) अशी या मुलांची नावं आहेत. बेपत्ता असलेला गुड्डू वझेर शहा (वय १५ वर्षे) हा मुलगा मुंब्रा, कोळीवाडा येथील रहिवासी आहे. भरती सुरू झाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळपासून पुन्हा एकदा तिसऱ्या मुलाचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112





Comments