सर्व व्यापारी आस्थापने उघडणेसाठी उद्या दुपारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न व्यापारी संघटना निर्णय घेणार.....*
(छाया - तय्यब अली)
चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित व्यापारी बैठकीत बोलताना संजय शेटे, डावीकडून प्रदीपभाई कापडिया, जयेश ओसवाल,आदी
*कोल्हापूर ०९ :* महाराष्ट्र शासनाने DMU/२०२०/CR.९२/DisM-१ या दि. ०४ एप्रिल २०२१ च्या परिपत्रकानुसार तसेच कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांचे परिपत्रक जा.क्र.नैआ/कोरोना विषाणू/आरआर/१०८/२०२१ प्रमाणे संपुर्ण राज्यामध्ये दि. ०५ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजेपासून ते दि. ३० एप्रिल २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून उर्वरीत सर्व व्यापारी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय दिला आहे.
यासंदर्भात आज दि. ०८ एप्रिल २०२१ रोजी मा. दौलत देसाई, जिल्हाधिकारी, मा. कादंबरी बलकवडे, आयुक्त, को.म.न.पा., मा. शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक व सर्व संबधीत अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न व्यापारी संघटना यांची व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मिटींग घेण्यात आली.
“पुढील आठवड्यामध्ये गुढीपाडवा आहे. हा साडेतीनमुहुर्तापैकी एक मुहुर्त असल्याने सोने-चांदी, कपडे व इलेक्ट्रॉनीक वस्तू ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. परंतू सदर सराफ व्यापारी, कापड व्यापारी व इलेक्ट्रॉनिक व्यापारी यांना सदरच्या वस्तू आधि दोन ते तीन दिवस आपल्या दुकानामध्ये मांडाव्या लागतात. व्यापाऱ्यांनी आधीच १ तारखेला सणासुदीसाठी व दररोजच्या व्यवहारासाठी दुकानांमध्ये माल भरलेला आहे. जर सणाला दुकानामधून सदर मालाची विक्री झाली नाही तर, व्यापाऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच, जीएसटीचे एप्रिल महिन्यातील १० तारखेला मासिक रिटर्न व त्रैमासिक रिटर्न भरण्याची मुदतही २० तारखेला आहे. जर जीएसटीचे वरील नमूद रिटर्न वेळेवर नाही भरले तर सदर रिटर्नचे दंड व व्याज याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांच्या कर्जाच्या बँकेचे व्याज व हप्ते हे वेळोवेळी नाही भरले तर सदरची खाती NPA मध्ये जाऊन व्यापाऱ्यांचे क्रेडीट खराब होते. अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा, भाजीमार्केट इत्यादी चालू ठेवून कोरोना होत नसेल तर सर्व व्यापारी आस्थापना सूरू केल्यास केल्यास कोरोना होतो हा शासनाचा निष्कर्ष पुर्णत: अन्यायकारक व चुकीचा आहे.” वरीलप्रमाणे व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत सदर मिटींगमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मा. संजय शेटे यांनी आक्रमकपणे बाजू मांडून सर्व व्यापारी आस्थापना उघडणेसाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली.
महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे यांनी राज्य स्तरावरील सर्व व्यापारी संघटना यांच्याकडे व्यापारी आस्थापना उघडणेसंबधी दोन दिवसाची मुदत मागीतली आहे. असे मा. जिल्हाधिकारी यांनी मिटींगमध्ये सांगून सी.ए. ऑफीस, चारचाकी गांड्याचे स्पेअरपार्ट विक्री करणारी दुकाने व बांधकाम साहीत्य विक्री गोडावूनमधून करणेस परवानगी दिली.
त्यानुसार, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, सर्व सलंग्न संघटना व व्यापारी यांचेमध्ये आज दि. ०८ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ४ वाजता बैठक झाली. या बैठकीमध्ये सकाळी जिल्हाप्रशासन यांचेबरोबर झालेल्या मिटींगचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर जर आज रात्रीपर्यंत सर्व व्यापारी आस्थापने उघडणेसंबधी शासनाचा कोणताही निर्णय किंवा कोणतेही परिपत्रक मिळाले नाही तर उद्या दि. ०९ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ४ वाजता मिटींग घेऊन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्टीज व सर्व सलंग्न संघटना आपली पुढील दिशा ठरवेल, असा निर्णय झाला. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्रील अँड अॅग्रीकल्चर या राज्यस्तरीय व्यापारी संघटनेची सर्व राज्यातील व्यापारी असोसिएशन याच्यांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणाऱ्या मिटींग मध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आपली बाजू मांडावी असे ठरले.
या बैठकीमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार मानद सचिव जयेश ओसवाल व वैभव सावर्डेकर,, माजी अध्यक्ष आनंद माने व प्रदीपभाई कापडीया यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व संचालक मंडळ व सर्व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment