प्रवासी रेल्वे सेवा सुरु राहणार की बंद होणार? केंद्र सरकारने केलं स्पष्ट




प्रवासी रेल्वे सेवा सुरु राहणार की बंद होणार? केंद्र सरकारने केलं स्पष्ट


देशात पुन्हा एकदा करोनाने कहर केला असून केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे तसंच काय उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबतच तज्ञांसोबतही चर्चा करत आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध असताना दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. दरम्यान काही राज्यांनी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवरही निर्बंध आणले आहेत. यादरम्यान अनेकांना प्रवासी रेल्वे सेवा सुरु राहणार की बंद होणार अशी चिंता सतावत आहे.केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवासी रेल्वे नेहमीप्रमाणे सुरु असतील असं स्पष्ट केलं आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली असून घाबरण्याची किंवा अंदाज बांधण्याची कोणतीही गरज नसल्याचं म्हटलं आहे. प्रवासी तिकीट बूक करुन आरामशीर आणि सुरक्षितपणे इच्छित स्थळी प्रवास करुन शकतात असं रेल्वेने म्हटलं आहे.सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जातील असं स्पष्ट करताना रेल्वेने नागरिकांनी तिकीट कंफर्म असेल किंवा आरक्षण असेल तरच रेल्वे स्थानकावर यावं अशी विनंती केली आहे.दरम्यान भारतात रविवारी २४ तासात दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले. तर १६१९ जणांचा मृत्यू झाला. देशात सध्या १९ लाख २९ हजार ३२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १२ कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112





Comments