ऑक्सिजन तुटवडा; बीएमसीनं घेतला मोठा निर्णय
ऑक्सिजन तुटवडा; बीएमसीनं घेतला मोठा निर्णय
मुंबई:-करोना रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीनंतर ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करून तो रुग्णांना पुरवण्यात येईल. या प्रकल्पांतून दररोज ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार असून त्यासाठी ९० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होवून कार्यादेशाला मंजुरी मिळताच एका महिन्यात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. बाधित रुग्णांच्या फुप्फुसांना होणारा संसर्ग लक्षात घेता, त्यांना सातत्याने आणि अधिक क्षमतेने प्राणवायू पुरवावा लागतो. वेळप्रसंगी प्राणवायू पुरवठ्याअभावी कोविडबाधित रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित करावे लागले आहे. रुग्णालयांकडून प्राणवायूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्राणवायू उत्पादक आणि वाहतूकदारांच्या क्षमता व मर्यादा लक्षात घेता मागणी व पुरवठा यांचा मेळ घालताना सरकार आणि पालिकेची कसरत होते आहे.या स्थितीत पालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये स्वतःचे प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. पालिकेने दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे ५०० घनमीटर क्षमतेचा प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारला आहे. तर जोगेश्वरीत बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामध्ये वर्षभरापूर्वी प्रतिदिन १ हजार ७४० घनमीटर क्षमतेचा प्रकल्प उभारला आहे. या दोन्ही रुग्णालयांतील प्राणवायू निर्मिती प्रकल्प व्यवस्थित कार्यरत असून कोविड संसर्गाच्या काळात ते अत्यंत मोलाचे ठरत आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
असा साकारणार प्रकल्प
असा तयार होणार प्राणवायू
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment