अमरावती व्हेरियंटमुळे भारतात करोनाची दुसरी लाट?
अमरावती व्हेरियंटमुळे भारतात करोनाची दुसरी लाट?
नागपुरः देशात करोना संसर्गाचे रुग्ण मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी अधिक वेगानं वाढत आहे. देशात करोनाची दुसरी लाट असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. भारतातील करोना संसर्गाची दुसऱ्या लाटेत बी.१.६१७ हा व्हेरियंट आढळला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जगभरातील तज्ज्ञांकडून या व्हेरियंटचा अभ्यास करण्यात येत आहे. मात्र, अलीकडेच या व्हेरियंटबाबत नवीन माहिती समोर येत असून हा व्हेरियंट सर्वप्रथम महाराष्ट्रातील अमरावतीत आढळला असल्याचं एका अहवालानुसार समोर आलं आहे.फेब्रुवारीमध्ये सर्वप्रथम अमरावतीत बी.१.६१७ हा नवा व्हेरियंट आढळला आणि त्यानंतर इतर जिल्ह्यात त्याचा संसर्ग वाढला, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, भारतात आढळणाऱ्या डबल म्युटेशन असणाऱ्या व्हेरियंटबाबत अधिक संशोधन करण्यासाठी परदेशातील तज्ज्ञांनी विदर्भाकडं लक्ष केंद्रीत केलं असून अलीकडेच नागपुरातही त्यांनी भेट दिली होती, असं सांगण्यात येतं.भारतात आढळणारा हा व्हेरियंट युके आणि ब्राझीलच्या तुलनेत वेगळा आहे. याबाबत दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच चर्चादेखील करण्यात आली होती, अशी माहिती डॉक्टर नितीन शिंदे यांनी म्हटलं आहे. ब्रिटनसह अनेक देशांनी भारतात प्रवासावर बंदी घातली आहे. याचं कारण म्हणजे बी.१.६१७ या व्हेरियंटचा वेगानं होणार प्रसार तसंच, अमरावतीत करोना प्रादुर्भाव वाढण्यामागेही हेच कारण असल्याचं मानलं जात आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप संशोधनातून सिद्ध झालं नाहीये, असंही त्यांनी नमूद केलं आहे. एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं जाहीर केलेल्या अहवालानुसार, हा व्हेरियंट डिसेंबर २०२०मध्ये घेतलेल्या नमुन्यात आढळला होता.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कोविड कंट्रोल सल्लागार समितीतील सदस्य असलेले यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे डॉक्टर अतुल गवांडे यांनीही या करोना विषाणूच्या या नव्या व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. 'करोनाची ही दुसरी लाट अधिक धोकादायक आहे. या लाटेत सर्व कुटुंबच्या कुटुंब बाधित होत आहेत. विशेष म्हणजे विदर्भात कुटुंबातील सर्वच सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. याकडंही त्यांनी लक्ष वेधलं आहे. हा विषाणू किती घातक आहे, याबाबत अधिक संशोधन बाकी आहे.' संशोधक ग्रीस रॉबर्ट यांच्या अहवालानुसार, करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा हा विषाणू २० टक्के अधिक संसर्गजन्य आहे,' असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment