दोन चिमुकल्यांना कुशीत घेऊन मातेची विहिरीत उडी; 'ते' दृष्य पाहताच...
दोन चिमुकल्यांना कुशीत घेऊन मातेची विहिरीत उडी; 'ते' दृष्य पाहताच...
औरंगाबाद: औरंगाबादमधील गेवराई तांडा येथील एका शिवारातील विहिरीत २७ वर्षीय विवाहितेसह सात वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक वादातून विवाहितेने दोन्ही चिमुकल्यांसह आत्महत्या केली आहे तर मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. वैशाली रविंद्र थोरात (वय २७), अरोही रविंद्र थोरात (वय ६ वर्षे) आणि आयुष रविंद्र थोरात (तीन वर्ष सर्व रा. गेवराई) अशी मृतांची नावे आहेत. चिकलठाणा पोलिसांनी याबाबत माहिती दिली. सुनीता शेखर देसरडा यांचे गेवराई तांडा येथील निर्लेप कंपनीच्या पाठीमागे शेत असून या शेतातील विहिरीत त्यांच्या कामगाराला तीन मृतदेह तरंगताना दिसून आले. या घटनेची माहिती त्याने चिकलठाणा पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढल्यावर मृत महिला ही गेवराई येथील रहिवासी असल्याचे परिसरातल्या लोकांनी सांगितले. या घटनेची माहिती मृत महिला वैशाली हिच्या सासरच्या लोकांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मृत वैशाली हिच्या माहेरच्या लोकांची माहिती घेतली असता तिचे माहेर हे औरंगाबाद येथील क्रांतीनगरातील असल्याचे समोर आले. तिच्या माहेरच्या लोकांना या दुर्दैवी घटनेची तातडीने माहिती देण्यात आली.घटनास्थळी पोहचलेल्या माहेरच्या लोकांनी वैशाली व तिच्या मुलांचा घातपात करण्यात आल्याचा आरोप केला आहे. वैशाली आणि तिच्या दोन्ही चिमुकल्यांचे घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. माहेरच्या नातेवाईकांनी दोषी व्यक्तींना अटक करेपर्यंत आम्ही तिन्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. या घटनेची चिकलठाणा पोलिसांनी नोंद केली असून आरोपींच्या शोधासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.
घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
मुलांना पाहून अनेकांनी व्यक्त केली हळहळ
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment