अर्धवट जळालेले प्रेत; अवघ्या ७ तासात झाला उलगडा

 



अर्धवट जळालेले प्रेत; अवघ्या ७ तासात झाला उलगडा


 औरंगाबाद :-कुंभेफळ भागातील एका मोकळया परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील पुरूष जातीचे प्रेत आढळले होते. करमाड पोलिसांनी मृत शेख आमिर शेख नजीर (२४, रा. नारेगाव) अशी ओळख पटविली. या अज्ञात युवकाची ओळख पटविली. या युवकाच्या मृत्यु प्रकरणात तपासाची चक्रे फिरवित, करमाड पोलिसांनी एकाला तर स्थानिक गुन्हे शाखेने एका युवकाला अटक केली आहे.या प्रकरणातील एक संशयीत आरोपी फरार आहे. शेख आमिर याचा खुन पैशाच्या वाटणी तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून करण्यात आला. शेख आमिर याचा गळा दाबुन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर चाकुने गळा चिरण्यात आला. तसेच रिक्षातील पेट्रोल काढून या युवकाला जाळून मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खुनाच्या प्रकरणात शेख कामील उर्फ गुड्डू आणि शेख चांद शेख गणी (रा. नारेगाव) असे अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.कुंभेफळ येथे इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळील एका शेतात मंगळवारी (२० एप्रिल) अर्धवळ जळालेल्या पुरूष जातीचे प्रेत आढळले होते. पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस व त्यांच्या टिमने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी मृत व्यक्तीची पाहणी करून सदर मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला. या व्यक्तीचा गळा चिरलेला, व अर्धवट जळालेला असल्याकारणाने हा खुन असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. काही वेळेत मृत व्यक्तीची ओळख पटली. दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सीक टिम सह डॉग स्क्वॉडही आणण्यात आला. या डाग स्क्वॉडने काही अंतरापर्यंत मारेकऱ्याची माग काढण्यास मदत केली.या प्रकरणात करमाड पेालिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमनेही तपास सुरू केला. याप्रकरणात प्राथमिक माहितीवरून करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी व त्यांच्या टिमने शेख चांद शेख गणी (१९, रा. नारेगाव), तर स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने शेख कामील उर्फ गुड्डू शेख जमील रा. नारेगाव याला ताब्यात घेतले. तसेच एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. याशिवाय या गुन्हयामध्ये वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. या खुन प्रकरणातील तिसरा आरोपी बिहारी हा फरार असून त्याच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली.

असा केला खून

या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत शेख आमिर यासह शेख कामील, शेख चांद आणि बिहारी हे सर्वजण गुड्डूच्या रिक्षातून कुंभेफळ गेले सोमवारी रात्री गेले होते. त्यांनी रिक्षात बसून नशापाणी केली. पैशांची वाटणी आणि मागील झालेल्या भांडणाच्या कारणावरून या तिघांनी आमिर याला बेदम मारहाण केली. सुरवातीला आमिरचा गळा आवळला. बेशुद्ध झाल्यानंतर गुड्डू याने खिशातील चाकु काढून गळा चिरला. त्यानंतर तिघांनी रिक्षातून पेट्रोल काढून मयताला पेटवून दिले. घटना स्थळाहून पळ काढला अशी माहिती समोर आली आहे.

मयत आणि आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

मयत शेख आमिरसह गुड्डू, बिहारी आणि शेख चांद हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या तिघांच्या विरोधात विविध पो स ठाण्यात भंगार चोरी, लुटमारी, गाडीच्या काचा फोडून बटऱ्या लंपास करणे, हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणे. अशा विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक संदिप सोळुंके यांनी सांगितले.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112






Comments