नाशिक... महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वाधिक करोना प्रभावित शहर!




नाशिक... महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वाधिक करोना प्रभावित शहर


नवी दिल्ली :  मुंबईचे दररोजचे आकडे पाहता देशातील करोना संक्रमणानं सर्वाधिक प्रभावित झालेलं शहर ठरलंय असा तुमचा अंदाज असेल तर तुम्ही चूक करताय... १० लाख लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वाधिक करोना प्रभावित शहर नाशिक ठरलंय.देशात १० लाख लोकसंख्येमागे करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेली पहिली चार शहरं महाराष्ट्रातील आहे. गेल्या महिन्याभरापासून या शहरांमध्ये करोना मोठा प्रादुर्भाव आहे. या चार शहरांमध्ये नाशिक आघाडीवर आहे. त्यानंतर नागपूर, पुणे आणि मुंबईचा क्रमांक आहे. यात राजधानी दिल्ली ९ व्या क्रमांकावर आहे. तर लखनऊ, बेंगळुरू, भोपाळ, इंदूर आणि पाटणा यांचा देशातील टॉप टेन शहरांमध्ये समावेश होता.नाशिकमध्ये गेल्या एका महिन्यात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या ३९४७ होती. तर संपूर्ण महिन्यात या शहरात ९७ हजार ७६५ रुग्ण आढळले. १० लाख लोकसंख्येच्या दृष्टीनं पाहिलं तर हा आकडा ४६ हजार ०५० वर जातो.नाशिकनंतर नागपूरचा क्रमांक लागतो. एका महिन्यात नागपुरात १ लाख ३४ हजार ८४० रुग्ण आढळले आहेत. १० लाख लोकसंख्येच्या दृष्टीनं पाहिलं तर हा आकडा ४५ हजार ८५६ वर जातो.करोना संक्रमणाचा वेग काही कमी होईना! १५ दिवसांत मृतांची संख्या तिप्पटीनं वाढलीनागपूरनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. गेल्या महिन्यात पुण्यात एका दिवसात सर्वाधिक १० हजार ९२० रुग्ण आढळले. तर संपूर्ण महिन्याभराचा आकडा आहे २ लाख ४७ हजार ५२९... परंतु, १० लाख लोकसंख्येच्या तुलनेत पाहिलं तर हा आकडा ३६ हजार ३५९ वर आहे.मुंबईत गेल्या महिन्यात १६ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत ३ लाख ७० हजार रुग्णांची भर पडली आहे. इतर शहरांच्या तुलनेत ही संख्या खूप मोठी आहे. यानंतर करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव राजधानी दिल्लीत आहे. प्रत्येकी १० लाखांच्या लोकसंख्येनुसार करोना रुग्णसंख्या पाहून ही तुलना करण्यात आली आहे.१० लाखांच्या लोकसंख्येमागे सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण नाशिक या शहरात आढलले आहेत. राजधानी दिल्ली या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. दिल्लीत ज्या तेजीनं करोना संक्रमण फैलावताना दिसतंय त्यावरून परिस्थिती गंभीर असल्याचं दिसून येतंय. मुंबई आणि दिल्ली या शहरांतली लोकसंख्या इतर शहरांहून अधिक आहे आणि इथंच सर्वाधिक संक्रमण फैलावताना दिसतंय.लोकसंख्येच्या दृष्टीने पाहलं तर लखनऊमध्येही मोठ्या प्रमाणात संक्रमण फैलावलेलं दिसून येईल. १५ एप्रिल रोजी लखनऊमध्ये ४५०० करोनाबाधित रुग्ण आढळले. ही संख्या इतर शहरांच्या मानाने अधिक आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


 





Comments