जीवनाला कंटाळलो'; नागपुरात शिक्षकाची आत्महत्या





जीवनाला कंटाळलो'; नागपुरात शिक्षकाची आत्महत्या



 नागपूर:-'मी जीवनाला कंटाळलो आहे. पत्नी व मुलांनो मला माफ करा', अशा आशयची चिठ्ठी लिहून शिक्षकाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना ऑरेंजनगरमधील शिवनारायण अपार्टमेंट येथे बुधवारी सायंकाळी घडली.महेंद्र मधुकर वैरागडे (वय ४८) असे मृतकाचे नाव आहे. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र यांच्या पत्नी अश्विनी या उमरेडमधील शाळेत शिक्षका आहेत. त्यांना मुलगा व मुलगी आहे. बुधवारी महेंद्र यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक एस. एम. मुंडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी महेंद्र यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. 'जीवनाला कंटाळलो आहे. मला माफ करा', असे चिठ्ठीत लिहिले आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112




Comments