लज्जास्पद! मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार





 लज्जास्पद! मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार



छतरपूर: मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन्ही मुली या मंदिरातून घरी परतत होत्या. त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर तपास करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील प्रकाश ब्रह्मोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बदौरा कला गावात मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. गावातील एकाच कुटुंबातील दोन मुली अन्य मुलींसोबत प्रसादाच्या जेवणासाठी गेल्या होत्या. मंदिरातून जेवण करून निघाल्यानंतर परिसरातच एक ३५ वर्षीय तरूण त्यांच्याकडे गेला. त्यांना घरी सोडतो अशी बतावणी करून दुचाकीवरून घेऊन गेला. निर्जन ठिकाणी नेऊन त्या दोघींवर बलात्कार केला. त्यानंतर दोघींनाही गावाच्या बाहेर सोडून पसार झाला.दोन्ही पीडित मुली घरी रडतच गेल्या. त्यांनी सर्व हकिकत आपल्या आईला सांगितली. हे समजल्यानंतर त्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला. मुलींचे आईवडील पोलीस ठाण्यात गेले. आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अटक केली. दोघींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments