पत्नीसह मुलीला मारहाण आणि शिवीगाळ, वकील पतीसह मित्रावर गुन्हा




 पत्नीसह मुलीला मारहाण आणि शिवीगाळ, वकील पतीसह मित्रावर गुन्हा




सातारा: पत्नी आणि मुलीला मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या वकील पती आणि त्याच्या मित्राविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहराजवळील गोडोली येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.राजेश निकम आणि अमोल कुलकर्णी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही आरोपी फरार झाले आहेत. सातारा शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडोली येथे एक उच्चशिक्षित महिला तिच्या मुलीसमवेत राहते. राजेश आनंदराव निकम (रा. रमाकांत टॉवर, यादोगोपाळ पेठ, सातारा) हे त्यांचे पती आहेत.दरम्यान, संशयित राजेश निकम आणि त्यांचा मित्र अमोल कुलकर्णी हे दोघे जण महिलेच्या गोडोलीतील घरी गेले. येथे आल्यानंतर राजेश यांनी पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करीत त्यांच्या पोटात लाथा मारल्या. या घटनेनंतर संबंधित वकिलाच्या पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रोकडे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments