लॉकडाउनचे संकट ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव



लॉकडाउनचे संकट ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव



मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी असली तर देशांतर्गत इंधन दर स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दराल कोणताही बदल केला नाही. सलग चौथ्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत.आज सोमवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे.यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात १६ वेळा इंधन दरवाढ केली होती. यामुळे काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली होती. त्या १६ दिवसात पेट्रोल ४.७४ रुपयांनी महागले होते. तर डिझेलमध्ये या १६ दिवसांत झालेल्या दरवाढीने ४.५२ रुपयांची वाढ झाली होती. तर एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात इंधन दर स्थिर ठेवले होते.आज सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाचा भाव किंचित घसरला. ब्रेंट क्रूडचा भाव ०.३४ डॉलरच्या घसरणीसह ६६.४३ डॉलर झाला. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.३० डॉलरच्या घसरणीसह ६२.८३ डॉलर प्रती बॅरल झाला. दरम्यान, भारतात करोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी काही राज्यांनी रात्रीची कठोर संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे इंधन मागणीवर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments