मुंब्रा येथील प्राइम हॉस्पिटलला आग; चार रुग्णांचा मृत्यू




 मुंब्रा येथील प्राइम हॉस्पिटलला आग; चार रुग्णांचा मृत्यू



ठाणे: संपूर्ण राज्य करोनाच्या संकटाशी झुंजत असताना दुसरीकडे राज्यातील रुग्णालयांमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये घडलेल्या दुर्घटनांनंतर आता ठाणे जिल्ह्यातही दुर्घटना घडली आहे. मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे पावणे चारच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची घटना घडली तेव्हा रुग्णालयात एकूण २० रुग्ण होते. यापैकी सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आग लागल्यानंतर २० रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलं. आयसीयूतील सहा रुग्णांना बिलाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेनं दिली आहे.आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.



मृतांची नावे:

यास्मिन जफर सय्यद (वय ४६)
नवाब माजिद शेख ( वय ४७)
हालिमा बी सलमानी ( वय ७०)




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments