'ती' घरासमोर उभी असताना दोघेजण आले अन्...



 'ती' घरासमोर उभी असताना दोघेजण आले अन्...



 नागपूर:-उपराजधानीत पोलिस रस्त्यांवर असताना चाकूने वार करून तरुणीची हत्या करण्यात आली. ही थरारक घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास तांडापेठेतील बंसोड चौकात घडली. दिवसाढवळया घडलेल्या या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.पिंकी वर्मा (वय २५, रा. तांडापेठ), असे मृत युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकीचे आई-वडील राजनांदगाव येथे राहातात. तिचा भाऊ वाठोडा भागात राहातो. पिंकीचे तांडापेठ येथे घर असून, ती मैत्रिणीकडेच अधिक राहायची. चार दिवसांपूर्वी पिंकीचा परिसरातील दोघांसोबत वाद झाला. यावेळी त्यांनी पिंकीला ठार मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी दुपारी पिंकी ही घरी आली. घरासमोर उभी असताना दोन जण आले. त्यांनी चाकूने सपासप पिंकीच्या छातीवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात ती खाली पडली. दोघेही पसार झाले. घटनास्थळीच पिंकीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लोहित मतानी, पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नगराळे व गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments