लॉकडाऊन इफेक्ट; कोरोना रुग्णसंख्या निम्म्याने घटली, 24 तासात 259 रुग्ण




 लॉकडाऊन इफेक्ट; कोरोना रुग्णसंख्या निम्म्याने घटली, 24 तासात 259 रुग्ण 



रत्नागिरी:- जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम समोर आला आहे. जिल्ह्यात सापडणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या निम्म्याने घटली असुन मागील 24 तासात 259 रुग्ण सापडले आहेत. यातील आरटिपीसीआर चाचणी केलेले 148 तर अँटीजेन चाचणी केलेले 111 रुग्ण आहेत. यानंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 15,889 एवढी झाली आहे.मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा स्फोटच झाला होता. मागील दोन दिवस जिल्ह्यात सलग पाचशेपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. सतत वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत होती. मात्र जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे रुग्णसंख्या निम्म्याने घटली आहे.
 सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 259 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मागील 2 दिवसांच्या तुलनेत रुग्णसंख्या निम्म्याने घट झाली आहे. सावडलेल्या 259 रुग्णांमध्ये 148 रुग्णांनी आरटिपीसीआर तर 111 रुग्णांनी अँटीजेन टेस्ट केली आहे. सतत वाढणाऱ्या रुग्णासंख्येमुळे चिंतेत असणाऱ्या रत्नागिरीकराना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.




.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments