जिल्ह्यात 2 लाख 76 हजार जणांना मिळणार मोफत राशन
जिल्ह्यात 2 लाख 76 हजार जणांना मिळणार मोफत राशन
रत्नागिरी:- फोफावत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली. पंधरा दिवस असणार्या या संचारबंदीमध्ये गोरगरिबांचा रोजगार गेला असला तरी त्यांना रोटी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार अन्नसुरक्षा योजनेखालील लाभार्थ्यांना एक महिना मोफत धान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यात या योजनेचे लाभार्थी 2 लाख 76 हजार 712 कुटुंब आहेत. त्यातील 11 लाख 26 हजार 155 सदस्यांना त्याचा लाभ होणार आहे.कोरोनाच्या दुसर्या लाटेने राज्यासह जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. कोरोनाचा दुसरा स्ट्रेन जास्त वेगाने फैलावत असल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाला पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागले. गेल्या लॉकडाउनमध्ये गरिबांसाठी तीन महिने मोफत धान्यवाटप केले होते; मात्र कोरोनाची पहिली लाट आठ ते दहा महिने होती. त्यामुळे गरीब, हातावर पोट असणारे, घरेलू कामगार, रिक्षा चालक, नोंदणीकृत फेरीवाले यांचा विचार या दुसर्या लाटेमध्ये शासनाने केला आहे. त्यांना पंधरा दिवसासाठी 1500 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.संचारबंदीच्या या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी राज्यातील सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेतील मोफत धान्याचा लाभ आर्थिक दुर्बल योजनेतील अंत्योदय गटातील 38 हजार 537 शिधापत्रिकावरील 1 लाख 36 हजार 695 सदस्यांना तर प्राधान्य कुटुंब गटातील 2 लाख 35 हजार 174 सदस्य असे एकूण 11 लाख 26 हजार 155 सदस्यांना मिळणार आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment