मला बळीचा बकरा बनवला!; सचिन वाझे यांनी NIAवर केला गंभीर आरोप




 मला बळीचा बकरा बनवला!; सचिन वाझे यांनी NIAवर केला गंभीर आरोप



"मला बळीचा बकरा बनवला जात आहे" असा आरोप आज सचिन वाझे यांनी विशेष एनआयए कोर्टात केला. एनआयए अधिकाऱ्यांकडून माझी पुरेशी चौकशी झाली आहे. त्यामुळे आणखी कोठडी वाढवून देण्यात येऊ नये, अशी विनंतीही वाझे यांच्यातर्फे कोर्टात करण्यात आली. मात्र, वाझे यांची ही विनंती अमान्य करत त्यांची एनआयए कोठडी ३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. 'मी अँटिलिया प्रकरणात केवळ दीड दिवस तपास अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर तुझ्याविरोधात पुरावे आहेत आणि तुला अटक करण्यात येत आहे, असे मला अचानक सांगण्यात आले', असा दावाही वाझे यांनी आज कोर्टात केला. मी एनआयए समोर कोणत्याही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही, असेही वाझे यांनी पुढे कोर्टात नमूद केले.सचिन वाझे यांच्या म्हणण्यावर एनआयएकडून आक्षेप घेण्यात आला. एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी कोर्टात म्हणणे मांडले व प्रकरण किती गंभीर आहे याकडे लक्ष वेधले. "अगली बार यह सब सामान कनेक्ट होके आएगा, समझ जा... तुझे और तेरी पुरी फॅमिली को उडाने का बंदोबस्त कर दिया है", अशा स्वरूपाच्या धमकीची दोन पत्रे सदर स्कॉर्पिओमध्ये होती. त्यामुळे आरोप गंभीर आहेत, असे सिंग यांनी नमूद केले.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments