कारवांचीवाडी येथे पिस्तुलाचा धाक दाखवून मुद्देमाल लांबविला; तिघांना कोठडी





  कारवांचीवाडी येथे पिस्तुलाचा धाक दाखवून मुद्देमाल लांबविला; तिघांना कोठडी


रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा येथे दुकान मालकाला पिस्तुलचा धाक दाखवून एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्या प्रकरणातील तीन संशयितांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. किशोर कांतीलाल परमार (३०. सध्या रा. सिंधुदुर्ग, मूळ रा.राजस्थान), अणदाराम भराराम चौधरी (२९. सध्या रा.बेळगाव, मूळ रा.राजस्थान) आणि ईश्वरलाल तलसाजी माझीराणा (२१, रा.राजस्थान) अशी पोलिस कोठडी सनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात भेराराम ओखाजी सुन्देशा (३८, रा. खेडशी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार ६ मार्च रोजी रात्री ८ वा.सुमारास भेराराम यांच्या मालकीच्या महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात या तिघांनी पिस्तुलचा धाक दाखवला होता. त्यानंतर त्यांच्याकडील रोख १५ हजार रुपये, सोन्याची अंगठी, मोबाईल, सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकणू ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन गाडीतून पळ काढला होता. ग्रामीण पोलिसांनी संशयितांना गुजरात मधून अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले होते.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments