*श्रीमानयोगी सेवा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री.छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त श्री.शंभु महाराजांनाचा आगळीवेगळी आदरांजली.*
श्रीमानयोगी सेवा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री.छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त श्री.शंभु महाराजांनाचा आगळीवेगळी आदरांजली.
श्री.शंभूछत्रपतीनी राष्ट्र अस्मितेसाठी दिले बलिदान.
महाराजांना विनम्र आदरांजली वाहूया करुनी रक्तदान.
हे ब्रीदवाक्य घेऊन श्रीमानयोगी सेवा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मलबार हिल.मुंबई येथे बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर राबवून समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श ठेवला.
युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य सौ. दुर्गाताई भोसले शिंदे व मुंबईसह उपनगरातील अनेक श्री.शिवशंभुप्रेमींनी या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान करून बलिदान दिनानिमित्त श्री.छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली.
अवघ्या आठवड्याभरात नियोजन करून आयोजित केलेल्या या शिबिरास एकूण ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्री.राकेशदादा कोकरे, श्री.संजयदादा कोकरे व जयप्रकाश नगर रहिवाशी संघ यांनी सदर रक्तदान शिबिरास जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल व सर जे जे हॉस्पिटल रक्तपेढी यांनी रक्तपेढी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि रक्तदात्यांनी रक्तदानासारखे श्रेष्ठ दान केल्याबद्दल श्रीमानयोगी सेवा परिवाराच्या वतीने समस्तांचे आभार मानण्यात आले.
श्री.केशवराव भोसले, श्री.किरणदादा शिंदे, जोस्त्नाबेन मेहता मा.नगरसेवक, श्री.संजय शिर्के इत्यादी व अन्य या रक्तदान शिबिरास उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीमानयोगी सेवा परिवाराचे स्वप्नील काळे, संजय येडगे, विनोद काळे, किरण सकपाळ, संजय कोकरे, भगवान झोरे, संजय जांगळी, रविंद्र शेळके, प्रमोद कोकरे, संदेश जांगळी, तानाजी शेळके व परिवाराच्या समस्त शिलेदारांनी अथक परिश्रम घेतले.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment