माणसातला माणूस ,"सह्याद्री राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार'' प्राप्त आयु. संजयजी(दादा) भिमराव कोलप:-
ऐतिहासिक सांगली जिल्ह्यातील ईनामधामणी या गांवचा परंपरागत माणुसकीचा वारसा घेऊन जन्मास आलेले, आयु.मा.संजयजी कोलप,यांनी खडतर आयुष्याशी झुंज देऊन, आज आपलं विश्व निर्माण केलेले आहे. गांव सोडून मिरज-सांगली रस्त्यावर असणाऱ्या बेथेलहेमनगर नजिक काट्याकुट्यात रस्त्यावरच्या साध्या घरात संसार मांडला. अनेक खस्ता खात खात, आपल्या समजदार अर्धांगिनीच्या साथीने, पडेल ती मोलमजुरी करीत, घराची पेंटिंगची कामे घेत घेत शासकीय, निमशासकीय कामे घेऊन अनेक पेंटिंग कामगारांचे कुटुंब सावरले.आणि त्याचाच सन्मान म्हणून "सागली जिल्हा पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष बनले. त्यांच्या संसारवेलीवर उमललेली दोन मुली "अम्रुता व नम्रता ''तर एक मुलगा "सुयश ''शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर ऊभे करण्याचे श्रेय अर्थातच संजयजी व त्यांच्या सुविद्य पत्नीनाच जाते.
समाजात जन्मापासून म्रुत्यु पर्यंत कोणतीही घटना घडू दे, कोणतेही नैसर्गिक संकट येऊ दे, तेथे संजयजी कोलप तन,मन धनाने हजर असतात.
कोणीही त्यांचेकडे मदत मागावी आणि त्यानी ती दिली नाही असं कधीच होणार नाही. त्यांच्यामध्ये दानतता ठासून भरलेली आहे. सदोदित असणाऱ्या मदतीच्या हातामुळे त्यांना कधीच कमी पडंत नाही.ही मानवसेवेची क्रुपा आहे.
समाजात एकी नांदावी,आणि थोरामोठ्यांच्या जयंती सण सनावळी,राष्ट्रीय कार्यक्रम एकत्रित व्हावेत,जाती,वंश,धर्म भेद होऊ नये,याकरिता"सर्व धर्म समभाव''या मंडळाची स्थापना करून जनमानसात व भावी पिढीला एक आदर्श निर्माण करून दिला.
पुढे करून,विश्वास दाखवून विश्वासघात करणा-या,व कामापुरते वापर करून घेणा-या धूर्त व स्वार्थी लोकापासून अलिप्त राहून.आज त्यांनी आपले एक वेगळे विश्व जपलंय .
आज माणूस तोच आहे,
पण माणुसकी कधीच सोडली नाही. म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून "सह्याद्रीच्या राष्ट्रीय "उद्योजक''२०२१ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला .
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा