गुजरात सीमेवर पकडण्यात आली रत्नागिरीची तवेरा, गाडीत सापडले पिस्तुल आणि १५ लाख






  गुजरात सीमेवर पकडण्यात आली रत्नागिरीची तवेरा, गाडीत सापडले पिस्तुल आणि १५ लाख



रत्नागिरीत घडलेल्या एका गुन्ह्याशी सबंध असल्याची जोरदार चर्चा



रत्नागिरी : दिनांक १७, १८ मार्च रोजी गुजरात येथील वृत्तपत्रातून एक बातमी झळकली; जिचा सबंध थेट रत्नागिरीशी होता. बनासकांठा जिल्हा पोलीस प्रमुख तरुण दुग्गल यांच्या सूचनेवरून धनेरा पोलिसांचे पथक गुजरात सीमेवर वाहन तपासणी करीत असताना एक रत्नागिरी पासिंगची तवेरा गाडी पकडण्यात आली. या गाडीत असलेल्या बॅगमध्ये विना परवाना पिस्तूल सापडल्याने पोलिसांना धक्का बसला. यासह चांदीचे तुकडे व एकूण 15 लाख रुपये सापडले. याचदरम्यान गाडीत असणाऱ्या वाहनचालकाने आपले वाहन उलट केले आणि राजस्थानात पळून गेला. पोलिसांनी तीन संशयितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. असे वृत्त गुजरात मधील वृतापात्रातून झळकले.


रत्नागिरीत चर्चा

गुजारात वृत्तपत्रातून रत्नागिरी येथील तवेरा गाडी पकडल्याचे वृत्त झळकताच रत्नागिरीतील राजस्थानी समाजात कुजबुज सुरु झाली. गुजरात वृत्तपत्रातून आलेल्या संशयितांच्या फोटोत एक व्यक्ती रत्नागिरीतील आहे असे बोलले जात होते. ६ मार्च रोजी रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी महालक्ष्मी मंदिर येथे पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानदाराला लुटल्याचा प्रकार देखील घडला होता. ६ मार्च रोजी रात्री ८ वा. सुमारास भेराराम यांच्या मालकीच्या महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात या तिघांनी पिस्तुलचा धाक दाखवला होता. त्यानंतर त्यांच्याकडील रोख १५ हजार रुपये, सोन्याची अंगठी, मोबाईल, सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकणू ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन गाडीतून पळ काढला होता.


रत्नागिरी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली

आता खेडशी येथील गुन्हा संदर्भात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संशयितांना गुजरात मधून अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले. संशयितांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. किशोर कांतीलाल परमार (३०. सध्या रा. सिंधुदुर्ग, मूळ रा.राजस्थान), अणदाराम भराराम चौधरी (२९. सध्या रा.बेळगाव, मूळ रा.राजस्थान) आणि ईश्वरलाल तलसाजी माझीराणा (२१, रा.राजस्थान) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. 

आपापसातील वादातून घडली घटना ?

राजस्थानहून रत्नागिरीत व्यापारासाठी आलेले व येथे स्थाईक झालेले अनेक व्यापारी आहेत. आता राजस्थानहून अन्य समाजातील व्यापारी देखील रत्नागिरीत येऊन स्थिरावत आहेत. याच नव्याने आलेल्या व्यापार्यांमधील वादातून हि घटना घडली असावी अशी चर्चा देखील आता ऐकायला मिळत आहे. ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक विनीत चौधरी आता या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून लवकरच काही धक्कदायक बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments