रत्नागिरीतील संजीवनी प्रशिक्षण संस्था-चिपळूणच्या माध्यमातून सुरु असलेल्या नर्सिंग कॉलेजच्यावतीने जिल्ह्यातील सर्वसामान्य पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक
रत्नागिरीतील संजीवनी प्रशिक्षण संस्था-चिपळूणच्या माध्यमातून सुरु असलेल्या नर्सिंग कॉलेजच्यावतीने जिल्ह्यातील सर्वसामान्य पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक
सदर संस्थेवर कारवाई करण्याची मनसेची मागणी
रत्नागिरी:-रत्नागिरीतील संजीवनी प्रशिक्षण संस्था-चिपळूणच्या माध्यमातून सुरु असलेल्या नर्सिंग कॉलेजच्यावतीने जिल्ह्यातील सर्वसामान्य पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सदर आशयाचे पत्र मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला सादर केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संजीवनी प्रशिक्षण संस्था चिपळूणच्या माध्यमातून बेकायदेशीर महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सील बोर्डाची नोंदणी न करता बेकायदेशीर संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेज गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. सदर नर्सिंग कॉलेजच्यावतीने जिल्ह्यातील सर्वसामान्य पालक व विद्यार्थी यांची फसवणूक करुन एएनएम या कोर्सकरिता प्रवेश दिला जातो. या प्रवेशा दरम्यान फीच्या नावावर वाजवीपेक्षा जास्त पैसे वसुली सुरु आहे आणि याच्या मोबदल्यात आपल्या राज्यात मान्यता नसणाऱ्या असिस्टंट नर्सिंग मिडीयावायफरी (ANM) या कोर्सची सर्टिफिकेट संबंधीत प्रशिक्षणार्थ्यांना दिले जात आहे. सदरचा बेकायदेशीर धंदा सदर संस्थेमार्फत गेली अनेक वर्ष सुरु असून स्थानिक प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. सदर संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीसह चिपळूण व अन्य तालुक्यात तेही नव्याने प्रवेश प्रक्रीया सुरु असून प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांकडून ७३,५००/- रुपये प्रमाणे वसुल केले जात आहेत आणि यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पालकवर्ग शिकार होत आहेत. सदर संस्थेच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांना या संस्थेच्या फसवणुकीबाबत काहीच माहिती नाही, त्यामुळे आजही प्रवेशप्रक्रिया सुरु आहे. तरी संजीवनी प्रशिक्षण संस्था चिपळूण संचलित संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात सुरु असलेली प्रवेश प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी व सदर संस्थेची चौकशी होवून आपल्या जिल्ह्यात बेकायदेशीर सुरु असलेले संजीवनी नर्सिंग कॉलेज बंद करण्यात यावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. सदरचे पत्र दक्षिण रत्नागिरी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी आपल्या सहिनिशी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाला सादर केले आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment