वीज बिलांची थकबाकी वाढता वाढता वाढे, आता अखेर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर उठणार कारवाईचा बडगा?



वीज बिलांची थकबाकी वाढता वाढता वाढे,  आता अखेर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर उठणार कारवाईचा बडगा?


रत्नागिरी:-मागील वर्षभर कोरोना आपत्तीत भरडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी महावितरण कंपनीने जनतेला जुलै पासून बिल हप्त्याने भरायची सवलत दिली, अतिरिक्त सवलत देखील दिली. त्यानंतर देखील वीज बिल बाबत शंकाचे निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने अनेक मेळावे आयोजित केले. परंतु तरी देखील महवितरण कंपनीच्या थकबाकित वाढच झाली आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुरवातीच्या काळात ग्राहकांना हप्ते पद्धतीने बिल भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा अधिकार देण्यात आला होता.  परंतु अनेक ठिकाणी ग्राहकांची थकबाकी वसूल झाल्याचे वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनात आले आहे. यामुळे, महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना पुरेशा प्रमाणात माहिती देणे, थकीत  रक्कम वेळोवेळी भरून घेणे याबाबत कुचराई केली आहे का या बाबत तपासणी सुरू करण्यात आली आहे. या शिवाय थकबाकीचे वाढीव प्रमाण असलेल्या ठिकाणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आता कठोर कारवाई होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. वाढत्या थकबाकीमुळे कोंकण प्रादेशिक कार्यालय येथील प्रादेशिक संचालक श्री. प्रसाद रेशमे, यांनी  दृक्श्राव्य आढावा बैठक घेऊन कोकण परिमंडळ मधील वाढत्या थकबाकी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील 95598 वीज ग्राहकाकडून 38.81 कोटी रुपयांची रक्कम थकीत झाली आहे. याच अनुषंगाने कोकण परिमंडळ रत्नागिरी येथील  मुख्य अभियंता श्री देवेंद्र सायनेकर यांनी 26 व 27 मार्च रोजी  जिल्ह्यातील वीज थकबाकी परिस्थितीबाबत आढावा प्रत्यक्ष उपविभाग निहाय भेटी देऊन घेतला. या वेळी अनेक ठिकाणी महावितरण कंपनी कर्मचारी थकबाकीदार ग्राहकापर्यंत पोहोचले नसल्याची बाब लक्षात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील वीज ग्राहक बिल भरण्याची तयारी दाखवत असूनही तशी व्यवस्था करण्यात कर्मचाऱ्यांनी कसूर केली आहे का याचा अहवाल मागवण्यात येत आहे. याशिवाय थकबाकीदार वीज ग्राहकांची थकबाकी वसूल न करता अथवा हप्ता न भरता  वीज पुरवठा सुरू असल्यास त्याबाबत संबंधित वीज कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे बोलले जात आहे. एकूणच महावितरण कर्मचाऱ्याच्या  चुकीला माफी नाही असाच स्पष्ट संदेश मुख्य अभियंता यांनी दिल्याचे खत्रिलायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सध्या ग्राहकांना सुट्यांमुळे बिल भरणे शक्य व्हावे या साठी सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्रे 31 मार्च पर्यंत सगळे दिवस सुरू राहणार आहेत.एकूणच सध्या वीज बिल भरणा न केल्यास कामगाराची सुटका नाही हेच खरे.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments