खेड मधील कलाकार, लेखक, दिग्दर्शक भाऊ कार्ले यांना भारत ज्योती कलारत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
एका वर्षात तीन पुरस्कार मिळवत केली हॅट्रिक - शुभेच्छांचा वर्षाव
खेड :-खेड मधील एकांकिका लेखक, दिग्दर्शक व हौशी कलाकार भाऊ कार्ले यांना नुकताच भारत ज्योती कलारत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून, गेल्या वर्षात तीन पुरस्कार मिळवत केली हॅट्रिक केली आहे. भाऊ कार्ले यांना गेल्या वर्षभरात शाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय कलाभुषण पुरस्कार, महाराष्ट्र विकास लोकसेवा अकादमी मुंबईचा गुणिजनरत्न जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. अशा पाच राज्यातील पुरस्कार प्राप्त ११० कलाकारांमधून पाच कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला अाहे, यातील भारत ज्योती कलारत्न हा राष्ट्रीय पुरस्कार भाऊ कार्ले यांना जाहीर झाला आहे, त्यामुळे एका वर्षात पुरस्कारांची हॅट्रिक साधण्याची किमया भाऊ कार्ले यांनी केली आहे. याचबरोबर 'एम.व्हि.एल.ए.' ट्रस्ट च्या गौरव ग्रंथामध्ये त्यांची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे, या ग्रंथाचे प्रकाशन लौकरच दिल्ली मधे होणार आहे. भाऊ कार्ले यांच्या गेल्या चाळीस वर्षातील हौशी रंगभूमीवरील कार्याच्या मूल्यांकनावर त्यांना हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना व्यक्तिगत एकांकिका लेखन, दिग्दर्शन, अभिनय यामध्ये २८० राज्यस्तरीय बक्षिसे मिळाली आहेत. याप्रवासात भाऊ कार्ले यांना राहुल सोलापूरकर, आदेश बांदेकर, प्रशांत दामले या प्रमुख कलाकारांबरोबरच स्थानिक नाट्यगुरु कांता कानिटकर व भाऊ काटदरे, कनक-संघर्ष चे नयन साडविलकर, तसेच सहकारी हौशी कलाकार डॉ.प्रशांत पटवर्धन, संजय कदम यांचे मार्गदर्शन तसेच पत्नी प्रिया, मुले गायत्री व वेदांत यांची खंबीर साथ मिळाली असल्याचा ते आवर्जून उल्लेख करतात. एका वर्षात विविध तीन पुरस्कार मिळाल्याबद्दल चिपळूण व खेड मधील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
Comments
Post a Comment