आता एका क्लिकवर मिळणार रेशन कार्डवरील सर्व माहिती









 आता एका क्लिकवर मिळणार रेशन कार्डवरील सर्व माहिती



रत्नागिरी : सार्वजनिक वितरण प्रणाली आता लोकाभिमुख झाली आहे. सामान्य नागरिकांना त्यांचा धान्याचा हक्क मिळावा, उद्देशाने शासनाने विविध योजना लागू केला आहे. सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा विभाग गेल्या काही वर्षांपासून हायटेक झाली आहे. त्याच्याच एक भाग म्हणजे आता हातात असलेल्या स्मार्ट फोनवरून रेशन कार्डधारकांना सर्व माहिती मिळावी, या उद्देशाने आता 'मेरा राशन' हे नवीन ॲपही सुरू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून रेशन कार्डवर कुठले आणि किती धान्य उपलब्ध आहे. जवळचे दुकान कोणते आहे, शिधापत्रिकेची सद्यस्थिती काय आहे, ती शिधापत्रिका पात्र आहे की अपात्र आहे, याविषयी सर्व माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना ही माहिती समजण्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाही. घरबसल्याही ही सर्व माहिती या ॲपवर मिळणार आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments