रा. भा. शिर्के प्रशालेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह; शाळा ३ दिवस बंद
रा. भा. शिर्के प्रशालेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह; शाळा ३ दिवस बंद
रत्नागिरी : आज रत्नागिरीत जिल्ह्यात ६४ कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने चिंता अधिक वाढली आहे. रत्नागिरी शहरातील जुना माळ नाका येथील रा. भा. शिर्के प्रशालेचा एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शाळा ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय शालेय प्रशासनाने घेतला असून त्यासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना कळविण्यात आली आहे. या शाळेतील मुले डेरवण येथे क्रीडा स्पर्धेसाठी जाणार होती. स्पर्धेच्या नियमानुसार सोबत जाणाऱ्या शिक्षकांनी कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक होते. यानुसार येथील शिक्षकाने कोरोना टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा अहवाल येताच शाळा तातडीने सोडण्यात येऊन तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment