*पहिली टी-२०: टीम इंडियामध्ये कोणाला मिळणार संधी, जाणून घ्या संभाव्य संघ*

 *पहिली टी-२०: टीम इंडियामध्ये कोणाला मिळणार संधी, जाणून घ्या संभाव्य संघ*




हायलाइट्स:

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज पहिली टी-२०

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार लढत

दोन्ही संघात कोणते संभाव्य खेळाडू असतील


अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली टी-२० आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट चाहते कसोटी क्रिकेटचा आनंद घेत होते आता क्रिकेटमधील सर्वात छोट्या फॉर्मेटचा आनंद घेता येणार आहे.

दोन्ही संघातील पाच सामन्यांच्या मालिकेसाठी खेळाडूंनी जोरदार तयारी केली आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघासमोर अंतिम ११ खेळाडू निवडण्याचे आव्हान असेल. टीम इंडियातील स्टार खेळाडू आणि ऋषभ पंत यांच्या निवडीबाबत कोणता निर्णय घेतला जातो हे पाहावे लागले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतला पहिल्या टी-२० लढतीत संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या काही टी-२० सामन्यात विकेटकिपर म्हणून केएल राहुलने संघातील स्थान पक्के केले आहे. पण पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून जो शानदार फॉर्म दाखवला आहे, तो पाहता त्याला संघाबाहेर ठेवणे योग्य ठरणार नाही. पंत संघाबाहेर झाल तर सोशल मीडियावर देखील त्याचे पडसाद उमटतील.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments