बनावट कागदपत्रं तयार करत विधवेची जागा बळकावणारा भाजप पदाधिकारी गजाआड
उल्हासनगर : उल्हासनगर भाजपच्या उपाध्यक्षाला उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पांडुरंग लांडे, असे अटक झालेल्या भाजप उपाध्यक्षाचे नाव आहे. खोटी कागदपत्रं तयार करून एका विधवेच्या गोडाऊनवर कब्जा केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच ही कागदपत्रं तयार करून देणाऱ्या कुमार मेघवानी याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान भाजप उपाध्यक्ष लांडे यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उल्हासनगर कॅम्प 3 शांतीनगर भागात साई संगम ही इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर मनू छाबरीया यांचे गोडाऊन होते, त्यांनी निधनापूर्वी या मिळकतीचे सर्व अधिकार पत्नी रेखा यांच्या नावे केले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे गोडाऊन बंद होते. रेखा यांचा मुलगा अनिल वकील असल्याने त्याला या गोडाऊनमध्ये कार्यालय सुरू करायचे होते. त्यानुसर त्यांनी तिथे काम सुरू केले. याच दरम्यान 24 फेब्रुवारीला अनिल आपल्या भावासोबत काम सुरू आहे का हे पाहण्यासाठी आले. मात्र, या गोडाऊनच्या मुख्य दरवाजाला दुसरा लोखंडी दरवाजा लावून भाजपचा उपाध्यक्ष पांडुरंग लांडे याने गोडाऊनमध्ये प्रवेश करून हे गोडाऊन माझ्या मालकीचे असल्याचे भासवून अनिलला कागदपत्र दाखवले आणि त्यांना तिथून हकलवून लावले.
बनावट कागदपत्रं करणाऱ्याला अटक
ही कागदपत्रं अनिल छाबरीया यांनी तपासली असता सहीमध्ये तफावत असल्याचे त्यांना जाणवले. अखेर अनिल यांनी आपल्या आईसह मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून या संबंधी तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ याची शहानिशा करून गुन्हा दाखल केला आणि लांडे यांना अटक केली. याचा अधिक खोलवर तपास करत असताना पोलिसांनीही खोटे आणि बनावट कागदपत्रं तयार करणाऱ्याच्या शोध सुरू केला. यावेळी हे काम करणाऱ्या कुमार मेघवानी याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment