घराडा केमिकल्स अपघातस्थळी ना. उदय सामंतांनी दिली भेट
दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना कंपनीच्या वतीने प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येणार
रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनी च्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये आज एक दुर्घटना घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक कामगार गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करीत घटनास्थळी भेट दिली. अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या.या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येतील असे घरडा केमिकल्स तर्फे सांगण्यात आले आहे. जखमी असणाऱ्या कामगाराच्या उपचारासाठी वीस लाख रुपये कंपनी देणार आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने जाहीर केला आहे. सोबतच या ठिकाणी पोलीस यंत्रणा आपले वेगळे नियंत्रण कक्ष सुरू करेल. हा सर्व औद्योगिक परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली यापुढील काळात राहील याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यास सोबतच त्यांना रोजगार मिळण्याच्या बाबत कार्यवाही करण्यात येईल. या दुर्दैवी घटनेची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून पालकमंत्री श्री अनिल परब यांनीही याबाबत माहिती घेतली आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
Comments
Post a Comment