पोहायला गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू




 पोहायला गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू 



देवरुख:- पोहायला गेलेल्या एक प्रौढाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील आंगवली बावनदी सोरकोळी डोहात साेमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. कासारकोळवण येथील संजय तुकाराम करंबेळे (५०, रा. कासारकाेळवण) असे मृत्यू झाल्याचे प्राैढाचे नाव आहे.देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद प्रवीण जयराम डाफळे (३४, रा. कासारकोळवण, डाफळेवाडी) यांनी दिली आहे. प्रवीण आणि संजय हे दोघे सोमवारी दुपारी बावनदी पात्रात पोहायला गेले होते. आंगवली येथील बावनदी सोरकोळी डोहात पोहत असताना संजय करंबेळे यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते डोहात बुडू लागले हे लक्षात येताच प्रवीण डाफळे याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत पाण्याच्या बाहेर काढले.बेशुध्द अवस्थेत असताना संजय यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांनी तपासणी करून मृत घोषित केले. संजय यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. अधिक तपास साखरपा दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल संदेश जाधव हे करत आहेत.





........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments