शासकीय जमीन हडप नाऱ्या लोकांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने इशारा
कोल्हापूर :- (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जमीन गेल्या वर्षभरामध्ये महसूल व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने परस्पर खाजगी लोकांच्या नावावर करण्याचा मोठा घोटाळा कोल्हापूर जिल्हा मध्ये घडलेला आहे. यामध्ये सहा ते सात लोकांना अटक झालेली आहे, पण या प्रकरणात प्रमुख सूत्रधार सूत्रधार असणारी पेशाने कोल्हापुरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर व्यक्ती गुन्हा करूनही अद्याप मोकाट फिरत आहे, त्या व्यक्तीवरही अटकेची कारवाई होऊन चौकशी होणे आवश्यक आहे.
खरं म्हणजे शासकीय जमीन म्हणजे देशाची राज्याची म्हणजे जनतेची मालमत्ता आहे ती अशाप्रकारे कोणीतरी दरोडा घालून लुटत असेल तर ते जनतेचे नुकसान आहे. त्यामुळे ती शासकीय मालमत्ता खोट्या कागदपत्रांच्या हडप केली असेल तर ती पुन्हा शासनाच्या ताब्यात मिळणे गरजेचे आहे, तरी याबाबत कोणत्याही दबावाला आपल्या यंत्रणेने बळी न पडता जे कोणी गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा राज्याची मालमत्ता वाचण्यासाठी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने जन आंदोलन करू असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने यावेळी निवेदनाद्वारे पोलीस प्रमुख यांना देण्यात आला.
यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, विनोद डुंनुग, रमाकांत आंग्रे, चंद्रकांत पाटील, शंकरराव शेळके, राजेश वरक श्रीकांत भोसले, महादेव पाटील, किशोर घाटगे, सुभाष देसाई, अंजुम देसाई, लहू शिंदे, श्री. पी आर गवळी आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment