राजिवडा येथे मृतदेह सापडला: भाट्ये पुलावरून आत्महत्या केल्याचा संशय

 


 राजिवडा येथे मृतदेह सापडला: भाट्ये पुलावरून आत्महत्या केल्याचा संशय



रत्नागिरी : शहरातील एका औषधाच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृतदेह आज सकाळी राजिवडा किनारी सापडला. संतोष हरिश्चंद्र लोखंडे, वय ३४ असे या इसमाचे नाव असून तो कारावांची वाडी येथे राहतो. काल संतोष कामावर गेला नव्हता. सायंकाळी तो आपल्या पत्नीसोबत देवळात देखील जाऊन आला. त्यानंतर निघून गेलेला संतोष न परतल्याने घरातून शोधाशोध करण्यात आली. रात्री उशिरा त्याची दुचाकी भाट्ये पुलावर सापडली अशी माहिती मिळत आहे. आज सकाळी राजिवडा खाडी किनारी संतोष याचा मृतदेह सापडला. अतिशय मनमिळावू व प्रामाणिक अशी संतोषची ओळख होती. त्याच्या अचानक निघून जाण्याने मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments