इचलकरंजीच्या गावभाग पोलिसांनी गुटखा कारवाईची साधली हँट्रीक...
इचलकरंजी : गावभाग पोलिसांनी गुटखा कारवाईची साधली हँट्रीक साधली. यावेळी त्यांनी एकास अटक करून सुमारे 8 लाख, 56 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कर्नाटक राज्यातून बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात इचलकरंजीत सलग तिसर्या दिवशी कारवाई करत पोलिसांनी ‘हॅटट्रीक’ साधली.
इचलकरंजीमार्गे चारचाकी गाडीतून जयसिंगपूर येथे गुटख्याची वाहतूक करताना आज सोमवारी एकास मुद्देमालासह अटक करण्यात आली. सुमित सतिश कोठावळे असे त्याचे नांव आहे. या कारवाईत सुमारे 56 हजार 500 रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ , मोबाईल आणि 8 लाखाची मारुती सुझुकी कंपनीची चारचारकी गाडी असा सुमारे 8 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गावभाग पोलिसांच्या पथकाने केली.
महाराष्ट्र राज्यात गुटखा उत्पादन व विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. परंतू , शहरानजीकच्या सीमाभागातून चोरट्या मार्गाने गुटखा आणला जात आहे. गत तीन दिवसांपासून नदीवेस नाका परिसरात अशा बेकायदेशीर गुटखा वाहतूकीवर गावभाग पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी दुचाकीवरुन गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर रविवारी सायंकाळी दुचाकीवरुनच गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ नेणार्यास अटक करुन 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आज सोमवारी सकाळी गावभाग पोलिसांकडून जुना नदीवेस नाका मरगुबाई मंदिर परिसरात वाहनांची तपासणी सुरु असताना संशयावरुन चारचाकी गाडी ताब्यात घेण्यात आली. गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले. त्यामध्ये 24 हजार 960 रुपयांचा विमल पानमसाला, 6240 रुपयांचा व्ही वन सुगंधी तंबाखू, 12 हजार 240 रुपयांचा स्टार पानमसाला, 3060 रुपयांचा बी वन सुंगधी तंबाखू, 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि 8 लाख रुपयांची गाडी असा सुमारे 8 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याचे प्रभारी निरिक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली राम पाटील, सुधीर गणबावले, नितीन जाधव, एम. वाय. पाटील, भरत मोहिते यांच्या पथकाने केली.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment