छ.शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसामान्य नागरीकांची वीज तोडण्याचे पाप करू नका : - भारतीय जनता पार्टी



कोल्हापूर दि.२२    गेल्या एक वर्षा पासून संपुर्ण देश कोराना विषाणूमुळे संकटात आहे. अशा कठीण काळामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे, सर्वसामान्य लोकांचे जीवन अत्यंत कठीण झालेले आहे. आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. कोरोना संकट काळामध्ये जनतेला दिलासा देण्याऐवजी सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिल गोळा करण्यासाठी हे वसुली सरकार जोरदार प्रयत्न करत आहे.    

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन काळातील वाढीव वीज बिलाबाबत ग्राहक आणि महावितरण यामध्ये संघर्ष सुरू आहे.  कालच एका ग्राहकाने महावितरणचे कर्मचारी वीज तोडणीसाठी आले असता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाहीत खाजगी सावकारीलाही लाजवेल अशा पद्धतीने महावितरण कंपनी वीज तोडणी करत आहे.  कोल्हापूर ही शाहूंची नगरी असून या महाविकास आघाडी सरकारने वेळोवेळी शाहू महाराजांच्या नावावर मतदान मिळवून अनेक वर्षे सत्ता भोगली त्याच शाहू महाराजांच्या नगरीत अशा पद्धतीने एका नागरिकाला आत्महत्ये सारखे टोकाचे पाउल उचलावे लागते ही शरमेची बाब आहे. एकीकडे महाआघाडी सरकार मधील गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, दररोज एक दोन अधिकारी मोठ्या प्रमाणावर लाच घेताना सापडत आहेत. हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले आहे.

कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सुरु असलेली अन्यायकारक वीज तोडणी थांबवली नाही व यात सर्व सामान्य नागरीक आत्महत्या सारखे प्रकार करताना दगावले गेले तर याची पूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी सरकार, प्रशासन व महावितरण कंपनी यांची असेल तसेच अशा पद्धतीची गंभीर घटना घडल्यास भारतीय जनता पार्टी संबंधीताविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. सावकारकी स्टाईलची वसुली करण्यासाठी येणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर आम्हाला संघर्ष करण्याची वेळ येऊ नये ही खबरदारी घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला.  

भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात येते की, महावितरणच्या माध्यमातून यापुढे विज तोडणीसाठी कर्मचारी दारात आले, तर नागरिकांनी भारतीय जनता पार्टीशी संपर्क साधावा. भाजपा पदाधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन वीज तोडणी थांबवतील. भाजपा कार्यालय फोन (०२३१-२५४८१०३)

वरील विषयाबाबत आघाडी सरकारच्या माध्यमातून महावितरणच्यावतीने सुरु असणाऱ्या या सावकारी वीज बील वसुली विरोधात भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांच्यावतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य महावितरण अधिकारी, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री व उत्तर आणि दक्षिण विधानसभा आमदार यांना ईमेल द्वारे निवेदन देण्यात आले.




...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments