सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

रत्नागिरी:-पोलीसंचा ससेमिरा चुकविण्यासाठी सेक्स रॅकेट चालविणारी टोळी अनेक वर्षे जिल्हे बदलून व्यवसाय करत असल्याचे तपासात पुढे आले आहे.रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथे सेक्स रॅकेट चालवणार्‍या महिला आणि प्रौढाला न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
पद्मीनबाई तुकाराम बादलवाड (43, रा.टेंभुर्णी सोलापूर) आणि शिवाजी आनंदराव पाटील (58,रा. वारुंजी सिध्दनाथ मंदिराशेजारी, कराड, जि.सातारा) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

गुरुवारी 25 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले होते.त्यानंतर त्यांना दोन वेळा पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.बुधवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

क्लिक करा आणि वाचा:ओसवाल नगर सेक्स रॅकेट



..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments