दारुड्या मुलाने आईला बांधावरून ढकलले




  दारुड्या मुलाने आईला बांधावरून ढकलले


 देवरुख : मद्याच्या नशेत एका प्रौढाने आपल्या वृद्ध आईला बांधावरून ढकलून दिल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी घुमाणेवाडी येथे घडली आहे. यात सुलोचना गणपत शिंदे (७०) या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी अशोक गणपत शिंदे याच्यावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रामचंद्र शिंदे यांनी दिली आहे. सुलोचना शिंदे या घरात असताना त्यांचा मुलगा अशोक दारू पिऊन आला आणि त्यांच्याशी भांडण करू लागला. भांडणादरम्यान अशोकने सुलोचना यांना शिवीगाळ करून घरामागील उंच बांधावरून खाली ढकलून दिले. यामुळे सुलोचना यांच्या कपाळाला व नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. यात त्या जखमी झाल्या. याबाबत अधिक तपास हेडकॉन्स्टेबल जावेद तडवी करीत आहेत.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments