*"पगडी संभाल जठ्ठा" कार्यक्रमातून शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना अभिवादन*

                                                                  (छाया - तय्यब अली) 
कोल्हापूर :- (प्रतिनिधी) २३ मार्च शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या स्मृती दिनानिमित्त *"पगडी सांभाल जठ्ठा"* या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरचा कार्यक्रम अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने आज बिंदू चौक येथे कार्यक्रम आयोजित करणेत आला होता.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु "अमर रहे" या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे भरत लाटकर यांनी क्रांतिकारी गाणी गायली. तसेच कॉ.रवी जाधव, कॉ. नामदेव गावडे, संभाजीराव जगदाळे यांनी भगतसिंगाच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा.सुनीता अमृतसागर आभार व्यक्त केले. 
 यावेळी बाबूराव कदम, बी.एल.बरगे, उदय नारकर, सुभाष जाधव, प्रा.डॉ.टी.एस. पाटील, राजेश वडणगेकर, दिलदार मुजावर, आशा बरगे, व्यंकप्पा भोसले, वसंतराव पाटील, इर्शाद करास, आसिफ मुल्ला, शहाबान मोमीन, अकिस खान, प्रशांत आंबी, आरती रेडकर, इक्बाल मोमीन आदी उपस्थित होते. 





...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments