कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने घरफाळा घोटाळ्या विरोधात आयुक्तांना निवेदन
प्रशासन गेंड्याच्या कातडीचे निर्लज्ज आहे. कारण जून २०२० पासून या घरफाळा
घोटाळ्याची सन २००१ पासून निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करुन त्याची श्वेतपत्रिका जनतेसमोर जाहीर करावी. अशी आम्ही मागणी करीत आहोत. त्यावर आपण दोन महिन्यात चौकशी करुन अहवाल जाहीर करतो असे आश्वासन दिले
होते. पण आजअखेर आम्ही आपणाकडे निवेदन, शिष्टमंडळाबरोबर प्रशासनाला
जाग आणण्यासाठी निदर्शने, जनआंदोलनेही केलेली आहेत. तरीही आपण म्हणावी तशी कारवाई केलेली नाही. ऑगस्ट २०२० मध्ये महापालिकेने चौकशी समिती नेमून एक अहवाल तयार केला, त्यावरही कोणतीच कार्यवाही केलेली
नाही, तसेच निवृत्त न्यायधीशांमार्फत घोटाळ्याची चौकशी करण्याची मुळ मागणी केली होती, त्या मागणीला महापालिकाने लेखी पत्र देऊन असमर्थता दाखविली आहे. या घोटाळ्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून समितीच्यावतीने
राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे या घोटाळ्याची
एस.आय.टी. मार्फत चौकशी करण्याची प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. पण त्यावर त्यांनीही काहीच हालचाल केलेली दिसत नाही. म्हणून समितीच्यावतीने
दि.३/२/२०२१ रोजी मा. आयुक्त रजेवर असताना अतिरिक्त आयुक्त मा.नितीन
देसाईसोा यांचेकडे नऊ मुद्यांचे निवेदन दिले होते व या मुद्यांचा जाहीर खुलासा करावा. अशी मागणी केली होती. पण त्यावरही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही.
म्हणून आज पुन्हा समितीचेवतीने महापालिकेत घरफाळा घोटाळा झालेला आहे, की नाही तो प्रशासनाला मान्य आहे की नाही याचा वृत्तपत्रातून प्रशासकांनी स्वतः जाहीर खुलासा करावा. गेली पंधरा दिवस या घरफाळा घोटाळ्यासंदर्भात राजकीय चिखलफेक होऊन हे राजकीय लोक लेखी पुरावे प्रशासनाकडे देत असतानाही प्रशासन आपली भुमिका गुलदस्त्यात का ठेवत आहे ? याचे गौडबंगाल काय आहे? हेच कळत नाही. प्रशासन असे स्थानिक स्वराज्य संस्थेला अडचणीत आणणारे भयंकर घोटाळे दाबून ठेवत असेल आणि जनतेच्या महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असेल, तर करदाते नागरिक म्हणून आम्हाला स्वस्थ बसून चालणार नाही. यासाठी आम्हांस नाईलाजाने अधिकाऱ्यांना घेराव, कार्यालयास टाळा ठोक, जलसमाधी, आत्मदहन, प्रामाणिक नागरिकांना घरफाळा भरु नका असे आवाहन करणे इ. प्रकारच्या लोकशाहीच्या सनदशीर मार्गांचा अवलंब करुन आंदोलन करू असा इशारा यावेळी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने देण्यात आले.
यावेळी रमेश मोरे, अशोक पोवार, पंपू सुर्वे, कादर मलबारी, भाऊ घोडके, अजित सासणे, संभाजी जगदाळे, विनोद डुंणूग, लहुजी शिंदे चंद्रकांत पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, अंजुम देसाई, भाऊ घोगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment