सात दिवस बँका बंद ? वाचा व्हायरल मेसेज मागचं सत्य

 




सात  दिवस  बँका बंद ? वाचा व्हायरल मेसेज मागचं सत्य 




'देशभरातील बँकांमधील कामकाज २७ मार्चपासून सात दिवस बंद असेल,' असा मेसेज सध्या व्हायरल होतो आहे. मार्चअखेर असताना 'बंद'मुळे बँकांमधील कामे खोळंबणार असल्याचेही मेसेजमध्ये म्हटले आहे. प्रत्यक्षात सात दिवस नव्हे, तर पाच दिवस बँका बंद असतील. उर्वरित दिवसांत बँका पूर्ण वेळ सुरू असतील.प्रचलित नियमांनुसार दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी; तसेच सर्व रविवारी बँकांना सुटी असते. २७ मार्च रोजी चौथ्या शनिवारनिमित्त बँका बंद होत्या. २८ मार्च रोजी रविवारची सुटी आहे. २९ मार्च रोजी सोमवारी धूलिवंदनानिमित्त बँका बंद राहतील. त्यामुळे शनिवार, रविवार व सोमवार असे सलग तीन दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर ३० तारखेला मंगळवारी बँका पूर्ण वेळ सुरू असतील. पूर्वी ३१ मार्च रोजी बँकेत फक्त करभरणासंदर्भातील सरकारी कामकाज चालत असे. आता मात्र, ३१ मार्च रोजीही बँकांमध्ये नियमित कामकाज सुरू असते. त्यामुळे या दिवशी बँका नियमित सुरू असतील. एक एप्रिल रोजी नव्या आर्थिक वर्षासंदर्भातील कामामुळे बँकांचे कामकाज सर्वसामान्यांसाठी बंद राहील. दोन एप्रिल रोजी शुक्रवारी गुडफ्रायडेनिमित्त बँकांना सुटी आहे. त्यामुळे पुन्हा सलग दोन दिवस सर्वसामान्य खातेदारांसाठी बँकांचे कामकाज बंद असेल. त्यानंतर तीन एप्रिल रोजी बँकांना सुटी असल्याचे या व्हायरल मेसेजेसमध्ये म्हटले आहे. परंतु, हा पहिला शनिवार असल्याने या दिवशी बँकांचे कामकाज पूर्ण वेळ सुरू असेल. यानंतर रविवारमुळे चार एप्रिल रोजी बँकांना सुटी असेल. असे असले तरी या काळात ऑनलाइन बँकिंग, एटीएममधील व्यवहार, मोबाइल बँकिंग आदी पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत.


बँकांच्या सुट्या

२८ मार्च - रविवार

२९ मार्च - धुलिवंदन

एक एप्रिल - नवे आर्थिक वर्ष

दोन एप्रिल - गुडफ्रायडे

चार एप्रिल - रविवार




........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


Comments