महिलांची मासिक पाळी याविषयी मार्गदर्शन

 

  पनवेल :- (प्रतिनिधी) महिला दिनानिमित्त  नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्ट आणि स्मार्ट चॉईस या संस्थेमार्फत पनवेल तालुक्यात दुन्द्रा वाडी, बोंडारपाडा, तामसई, फणसवाडी आणि गारमाल या आदिवासी पाड्यांवर  महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? या विषयाअंतर्गत महिलांसाठी विमामुल्य आरोग्यविषयक जनजागृतीचा उपक्रम, कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून राबवण्यात आला. 

 या कार्यक्रमात मासिक पाळीबद्दल असलेले रूढी, परंपरा याच्या नावाखाली चालत आलेले समज-गैरसमज, अंधश्रद्धा दूर करून मासिक पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी तसेच बाजारात उपलब्ध प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिन मुळे महिलांना होणाऱ्या विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी जैविक सॅनिटरी नॅपकिन ही काळाची गरज आहे. याविषयी माहिती देण्यात आली. संस्थेच्या वतीने, श्री दीपक खाडे (कौंसलर) यांनी सदर मार्गदर्शन केले. तसेच दोनशे महिला आणि किशोरवयीन मुलींना सौ. शैला खाडे यांच्या हस्ते ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड चे मोफत वितरण करण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप कारण्यात आला.

  महिलांच्या मासिक पाळीबाबत बऱ्याचदा महिलांमध्येच उदासीनता दिसून येते. परंतु या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 सदर कार्यक्रम स्मार्ट चॉईस च्या सभासदांच्या सहकार्याने सौ. निर्मलाताई चौधरी, समाधान पारकर, नम्रता ठाकूर यांच्या मदतीने संपन्न झाला.

  संस्थे मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात शाळा, कॉलेज, गावं, आदिवासी पाडे अशा ठिकाणी तीनशे पन्नास पेक्षा जास्त विनामूल्य कार्यक्रम राबवले आहेत. 


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments