पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे निर्देश
पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे निर्देश
अवैध मासेमारी रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा आणणार
कायदा पारित न झाल्यास मंत्रालयासमोर भव्य आंदोलन छेडू: आमदार योगेश कदम
आमदार रमेश पाटील व चेतन पाटील यांच्या शिष्टमंडळानेही यावेळी श्री. शेख यांची भेट घेतली. अवैध मासेमारी विरुद्ध कारवाई करणे, सागरी किनाऱ्यावर जेट्टी, मासे उतरविण्यासाठी जागा उभारण्याची त्यांनी मागणी केली.त्यावर श्री. शेख म्हणाले की, सागरी किनाऱ्यावरील जेट्टी, मासे उतरविण्याच्या जागा विकसित करणे, शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारणे आदी कामे सुरू करण्यात येत आहे. येत्या दोन ते तीन वर्षात ही कामे वेगाने पूर्ण होतील. तसेच कोकण किनारपट्टीवर येत्या काही काळात तीन मोठे लँडिंग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. तसेच समुद्र किनाऱ्यावरील गाळ काढण्यासाठी विशेष तरतूद करण्याचे निर्देशही श्री. शेख यांनी यावेळी दिले.
यासंदर्भात आमदार योगेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले मंत्री अस्लम शेख यांनी एल.ई.डी. मासेमारी संदर्भात कायदा येत्या ३० दिवसात केला जाईल असे आश्वासन दिले आहे. तसेच कारवाई करण्यासाठी परप्रांतीय मच्छीमारी नौका, एल.ई.डी.नौकांवर कारवाई करण्यासाठी नविन बोटी मिळेपर्यंत भाडेतत्त्वावर बोटी घेतल्या जातील असेही आश्वासन दिले आहे. मात्र कायदा न पारित झाल्यास स्थानिक मच्छिमारांसमवेत मंत्रालयासमोर भव्य आंदोलन छेडावे लागेल. अशी प्रतिक्रिया आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment