दोन वर्षापासून बंद असलेली सैन्यभरती प्रक्रिया राबविण्यात यावी : सेवाव्रत प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने निवेदनातून मागणी
(छाया - तय्यब अली)
कोल्हापूर : (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा शिव शाहू विचारांचा जिल्हा असून भारतीय संरक्षण दल भरती होण्याची कोल्हापूर जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहेच व आई अंबाबाई आशीर्वाद पण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक प्रत्येक वर्षी होणाऱ्या सैन्य भरतीतून भारतमातेच्या सेवा व रक्षणासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेऊन देशाच्या संरक्षणासाठी दलात भरती होत असतात. मात्र मार्च 2019 नंतर आजअखेर सैनिक भरती झालेली नाही. भारतीय स्थल सेनेच्या कोल्हापूर विभागात गेले वर्षभर Covid -19 या महामारीमुळे सैन्य भरती करण्यात आली नाही. या वर्षी मार्च महिन्यात दोन वेळा सैन्य भरतीची तारीख जाहीर करण्यात आली होती. पण जिल्हा प्रशासनाकडून भरती प्रक्रियेस परवानगी दिली गेली नाही. गेले दोन ते तीन वर्षापासून तयारी करणारे युवक सैनिक भरतीची वयोमर्यादा 23 असल्यामुळे ही संधी वाया जाईल, या विचाराने प्रचंड तणावाखाली हजारो युवक आहेत. ही त्यांच्यासाठी शेवटची संधी वाया गेल्यास याची संपुर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील याची आपण नोंद घ्यावी.
वरील विषयावर 23 वयोगटातील गांभीर्य लक्षात घ्यावे व सैन्यभरती लवकरात लवकर करण्यासाठी परवानगी द्यावी असे निवेदन जिल्ह्याधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी श्री.संभाजी(बंडा) साळुंखे, संजय पाटील, मनीष शहा, मनोहर सोरप (हिंदु महासभा अध्यक्ष), नितेश कोकितकर, अभय निर्मळ आदी उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment